[pune] - ‘नंबरप्लेटचे कामआम्हालाही द्या’

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'राज्यात वाहनांना हायसिक्युरिटी नंबरप्लेट सक्तीची केल्याने व त्याचे काम ठरावीक व्यक्तींनाच दिल्याने रेडियम नंबरप्लेट व्यावसायिक अडचणीत आले आहेत. तसेच हायसिक्युरिटी नंबरप्लेटमध्ये सुरक्षेचे कोणतेही निकष आढळत नाहीत. त्यामुळे हायसिक्युरिटी नंबरप्लेटच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे,' असा दावा 'रेडियम आर्ट्स असोसिएशन'तर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला.

असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष राहुल दरेकर, सचिव पांडुरंग पवार, सल्लागार अश्फाक शेख, खजिनदार उदय चौधरी आदी या वेळी उपस्थित होते. 'हायसिक्युरिटी नंबरप्लेट बनवण्याचे काम मोजक्याच व्यक्तींना देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील इतर सर्व रेडियम नंबरप्लेट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापैकी अनेकांनी कर्ज घेतलेले असून व्यवसायच होत नसेल, तर हप्ते कसे भरायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हायसिक्युरिटी नंबरप्लेट तपासल्यास त्यात 'आरटीओ'चा विशिष्ट क्रमांक वगळता सुरक्षिततेचे कोणतेही निकष आढळत नाहीत. त्यामुळे हायसिक्युरिटी नंबरप्लेट बनविण्याचे काम राज्यातील सर्व रेडियम नंबरप्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांना द्यावे,' असे या वेळी सांगण्यात आले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/63BlQAAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬