किरकोळ वादातून पोळपाट डोक्यात घालून युवकाची हत्या

  |   Akolanews

अकोला: सोबत दारू प्राशन करीत असताना, एका मित्राने दुसऱ्या मित्राला गमतीने शिवीगाळ केल्यामुळे संतप्त झालेल्या दुसºया मित्राने डोक्यात पोळपाट घालून एका त्याची निर्घुण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एमआयडीसी क्रमांक ११ मध्ये घडली. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुनील त्रिचंद पालवे(२६) याला अटक केली आहे.

मोलमजूरी करण्यासाठी येथून राजुशंकर ओंकार सालवे(२४ रा. साजनी, जि. बुरहानपूर)आणि सुनील त्रिचंद पालवे(२६ रा. गोंदरी जि. बुरहानपूर) मध्य प्रदेश दोघे मित्र अकोल्यातील एमआयडीसी भागात आले. येथील एका दालमिलमध्ये काम करून दोघेही परिसरात भाड्याने घेऊन राहायचे. दोघे नेहमी सोबत कामावर जायचे. सोबत जेवण करायचे. दोघेही एकमेकांचे जीवलग मित्रच होते. रविवारी सायंकाळी दोघेही सोबत दारू प्यायला गेले. तेथून परत घरी आले. काही वेळ थांबल्यानंतर राजुशंकर सालवे हा पुन्हा दारू पिण्यासाठी बाहेर गेला. काही वेळाने तो परत आल्यानंतर दोघांनी जेवण करण्यास सुरूवात केली. जेवण करीत असताना, राजुशंकर सालवे हा सुनील पालवे याच्यासोबत थट्टामस्करी करीत होता. दरम्यान त्याने गंमतीने सुनील पालवे याला शिवीगाळ केली. ही शिवीगाळ सुनील पालवे याला जिव्हारी लागल्याने, त्याने, जवळच असलेल्या लाकडी पोळपाट राजुशंकरच्या डोक्यात घातला. यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर आरोपी सुनील पालवे हा घटनास्थळावरून पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी राजुशंकरला उचलून तातडीने सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध केला. नाकाबंदी करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)

फोटो - http://v.duta.us/gTN-AQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6FF_bQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬