[mumbai] - राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक

  |   Mumbainews

मुंबई: माजी मंत्री सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळं रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते व माजी मंत्री नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. कुर्ला-अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले नवाब मलिक हे सध्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. माध्यमांतून ते पक्षाची बाजू अतिशय समर्थपणे मांडत असतात. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या मुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. उत्तर भारतीय असूनही त्यांची मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना पक्षाशी जोडून ठेवण्यास त्यांची मदत होऊ शकते, असा पक्षाचा होरा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाचा मलिक यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला विरोध असल्याची चर्चा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. मलिक यांच्याइतका सक्षम चेहरा मुंबईत नसल्याचंही कारण त्यांच्या नियुक्तीमागे असल्याचं बोललं जात आहे.

फोटो - http://v.duta.us/aqJhPwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/dKKJOwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬