[nagpur] - मुंबई-नागपूर मार्गावरील काही गाड्या रद्द; मार्गात बदल

  |   Nagpurnews

नागपूरः मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार, ५ ऑगस्ट रोजी मुंबईवरून सुटणाऱ्या विदर्भ, दुरंतो एक्स्प्रेससह तब्बल १५ गाड्या रद्द करण्यात आल्या. त्याचवेळी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विदर्भ, दुरंतो एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेत रवाना झाल्या.

गेल्या आठवडाभरापासून मुंबई व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मध्येच थांबवाव्या लागल्या. शनिवारी, रविवारी नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या अनेक गाड्या मधूनच परत आल्या. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

५ ऑगस्ट रोजी रद्द झालेल्या गाड्या पुढीलप्रमाणे -

२२८८६ टाटानगर- लो. टिळक टर्मिनस अंत्योदय एक्सप्रेस

१२२६२ हावडा- मुंबई एक्सप्रेस

११४०२ नागपूर- मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

१२८६९ मुंबई- हावडा एक्सप्रेस

११४०१ मुंबई- नंदीग्राम एक्सप्रेस

१२२६१ मुंबई- हावडा दुरंतो एक्सप्रेस...

फोटो - http://v.duta.us/kJ-BygAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M8ReTwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬