अमोल कोल्हे आणि उदयनराजेंमध्ये बंद दाराआड चर्चा; राष्ट्रवादीकडून मनधरणीचा प्रयत्न

  |   Maharashtranews

सातारा: भाजपमध्ये जाण्याचे वेध लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनधरणीसाठी आता पक्षातून प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवस्वराज्य यात्रेचा प्रमुख चेहरा असलेले अमोल कोल्हे यांनी सोमवारी उदयनराजे यांची भेट घेतली. सध्या सातारा विश्रामगृहात बंद दाराआड या दोन्ही नेत्यांची चर्चा सुरु असल्याचे समजते. या भेटीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये, यासाठी पक्षाकडून त्यांची मनधरणी सुरु असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात आली तेव्हा उदयनराजेंनी याठिकाणी उपस्थित राहणे टाळले होते. खासदार अमोल कोल्हे यांनी वारंवार फोन करूनही उदयनराजेंनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी अखेर सातारा विश्रामगृहावर उदयनराजेंना गाठले आहे. सध्या या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. यानंतर उदयनराजे काय निर्णय घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे....

फोटो - http://v.duta.us/L1wOVAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/zWR-5wAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬