[Mumbai] - अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश; बांधले शिवबंधन

  |   Mumbainews

मुंबई: काँग्रेसचे आमदार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून सत्तार पुन्हा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत उद्धव यांनी सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर केली. इतकेच नाही, तर मराठवाड्यात अब्दुल सत्तार यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचेही उद्धव म्हणाले.

गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांचा पीकविमा, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर शिवसेना राज्यात चांगले काम करत आहे. खरंतर मी काँग्रेसमध्ये असताना शेतकऱ्यांसाठी लढणे ही आमची जबाबदारी होती. मात्र, ती जबाबदारी सत्तेत असूनही शिवसेनेनं पार पाडलेली आहे, असं सत्तार म्हणाले. शिवसेनेच्या या कामगिरीमुळे मी प्रभावित झालोय. येत्या काळात पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन, असेही सत्तार म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/h0yMowAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hbMvBgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬