[Mumbai] - अमित शहांचे गणेश दर्शन, दुकाने, रस्ते वाहतूक बंद

  |   Mumbainews

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन विघ्नहर्त्या गणेशाचे सपत्नीक दर्शन घेतले. शहा यांच्या या व्हीव्हीआयपी दर्शनावेळी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सिद्धिविनायक परिसरातील वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती.

अमित शहा यांनी आज पत्नीसह सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी आले होते. शहा येणार असल्यामुळे सिद्धिविनायक परिसरातील हारफुलांची सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रस्त्याच्या बाजूची दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. तसेच शहा दर्शन घेऊन जाईपर्यंत या परिसरातील वाहतूकही थांबविण्यात आली होती. एवढेच नव्हे तर सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी असलेली भाविकांची रांगही थांबविण्यात आली होती. शहा मंदिरात येण्यापूर्वी मंदिरात दर्शनासाठी असलेल्या भाविकांना बाहेर काढण्यात आले. शहा यांचा ताफा येताच त्यांची गाडी थेट मंदिराच्या प्रवेशद्वारातच सोडण्यात आली. त्यानंतर शहा यांनी सिद्धिविनायकाची मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री आशिष शेलार आणि सिद्धिविनायक मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकरही उपस्थित होते. त्यानंतर शहा यांनी लालबागच्या राजाचंही सपत्नीक दर्शन घेतलं....

फोटो - http://v.duta.us/rgxzygAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/-eDcaQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬