[Mumbai] - ‘जमनालाल’मधील प्रवेश स्वायत्तता दर्जाप्रमाणेच: Sc

  |   Mumbainews

मुंबई: (जेबीआयएमएस) स्वायत्तता दर्जा कायम न राहिल्याने या संस्थेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांवर निर्माण झालेली टांगती तलवार अखेर दूर झाली आहे. जेबीआयएमएसमधील प्रवेश स्वायत्तता दर्जाप्रमाणे करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे या संस्थेतील प्रवेश प्रक्रिया आता स्वायत्तता दर्जानुसारच होणार आहे. तसेच न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील मॅनेजमेंट कोर्स प्रवेशांचा मार्गही झाला मोकळा.

मुंबई हायकोर्टाने पूर्वी 'अस्वायत्त' दर्जाप्रमाणे जेबीआयएमएस संस्थेत झालेले प्रवेश रद्द केले होते. त्याविरोधात प्रवेश झालेल्या ३९ विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात अपिल केले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांची विनंती अमान्य केली आणि हायकोर्टाचा निर्णय योग्य ठरवला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा व न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला....

फोटो - http://v.duta.us/88qn4QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DYHgHgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬