अवैध गौणखनिजवर कारवाई

  |   Sanglinews

कडेगाव : शहर प्रतिनीधी

कडेगाव तालुक्याच्या नूतन तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी अवैध गौणखनिज उत्खनन करणार्‍या तस्करांवर कारवाई केली. येवलेवाडी येथे अवैध मुरूम उत्खनन व वाहतूक करीत असताना जेसीबी, तीन ट्रॅक्टरसह 40 लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला. ही कारवाई शनिवार रात्री करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, येवलेवाडी हद्दीत मुरुमाचे अनाधिकृतपणे उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार डॉ. पाटील यांना मिळाली. त्यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना तत्काळ आदेश देऊन मुरुमाचे अनधिकृतपणे उत्खनन व वाहतूक करणारे विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर व जेसीबीसह 2 ब्रास मुरूम असा एकूण सुमारे चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्‍त केला.

कडेगाव तालुक्यातील येरळा व नांदणी नदीची वाळू पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या नद्यातून ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी व यारी आदीच्या सहाय्याने वाळू तस्करी होते. याचबरोबर सोनहिरा ओढा, महादेव ओढा व निमसोड ओढ्यातून रात्री वाळूची चोरी होत असते. येरळा नदीतील वाळू उपशाला उच्च न्यायालयाची बंदी आहे. हा आदेश मोडीत काढून वडियेरायबाग, वांगी, शिवणी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू चोरली जाते.

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Action-on-illegal-minerals/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Action-on-illegal-minerals/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬