आघाडीने काढलेले खड्डे मुजवण्यातच वेळ गेला

  |   Sanglinews

विटा : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आतापर्यंत काढलेले खड्डे मुजवण्यातच गेल्या पाच वर्षांतला आमचा वेळ गेला, अशी टीका शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानगुडे- पाटील यांनी येथे केली. शिवशाहीचे सरकार आल्यानंतर खर्‍या अर्थाने विकासाच्या कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाहीही यांनी दिली.

खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या निश्चय मेळाव्यात ते बोलत होते. आमदार अनिलराव बाबर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकरदादा पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलिंद कदम, सभापती मनीषा बागल प्रमुख उपस्थित होते.

प्रा. बानुगडे- पाटील म्हणाले, विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच आहे, पण या मतदारसंघातही शिवसेनेचा भगवा आमदार बाबर यांना पुन्हा विजयी करून फडकला पाहिजे. पाच वर्षांत बाबर यांनी बंदा रुपयासारखे काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत खानापूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांच्या पाठीशी ताकद उभी करा....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Our-time-in-the-last-five-years-has-been-spent-in-fixing-the-pits-drawn-by-the-Congress-NCP-alliance-till-now-says-nitin-banugade-patil-in-vita-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Our-time-in-the-last-five-years-has-been-spent-in-fixing-the-pits-drawn-by-the-Congress-NCP-alliance-till-now-says-nitin-banugade-patil-in-vita-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬