आचारसंहितेसाठी काटेकोर ‘वॉच’

  |   Sanglinews

सांगली : शशिकांत शिंदे

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी जिल्हाभरात विविध प्रकारची 145 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांचा सर्वत्र काटेकोर ‘वॉच’ राहणार आहे. तसेच आचारसंहिता भंग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दरम्यान, निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा कमाल 28 लाख रुपयापर्यंत आहे. त्याशिवाय त्यांना त्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमीही जाहीर करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे. दीपावलीआधीच राज्यात नवे सरकार स्थापन होणार आहे. राज्यात दि. 21 ऑक्टोबररोजी मतदान तर दि. 24 ऑक्टोबररोजी मतमोजणी होणार आहे. आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत कसे वागायचे, कसे बोलायचे याचे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/A-strict-watch-for-the-code-of-conduct/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/A-strict-watch-for-the-code-of-conduct/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬