उसाची ११७ कोटी एफआरपी थकीत

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या उसाची 117 कोटी रुपये एफआरपी थकीत ठेवली आहे. ही देणी न देणार्‍या कारखान्यांना गाळप परवाने मिळण्याची शक्यता कमी आहे.

यंदाच्या गाळप हंगामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळप परवाना मागण्याचे अर्ज केले आहेत. पण शुगर केन कंट्रोल अ‍ॅक्टनुसार शेतकर्‍यांना गाळप केलेल्या उसाची 14 दिवसात एफआरपी द्यावी लागते. ती न दिल्यास थकीत रक्कम व त्यावरील 15 टक्के व्याजासह द्यावी लागते.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी मुदतीत एफआरपी दिली नाही. तर काहींना एफआरपीचे तुकडे पाडले आहेत. तसेच अनेक कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. याबरोबरच कायद्याने देय व्याज दिले नाही. ही रक्कम जवळपास 117 कोटी रुपये आहे. साखर आयुक्त यांनी गेल्या वर्षी कडक भूमिका घेत अनेक कारखान्यांना देणी देण्यास भाग पाडले होते. काहींवर जप्तीची कारवाई केली होती. याबाबत सर्वच शेतकरी संघटना आग्रही राहतात. यंदा महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहे. कारखान्यांना ऊस कमी पडणार आहे. थकबाकी दिली तर शेतकरी ऊस देणार आहेत. साखर आयुक्तांनीही ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कारखान्यांना गाळप परवाने मिळण्यासाठी झगडावे लागणार आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/2-crore-FRP-of-sugarcane-was-pending/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/2-crore-FRP-of-sugarcane-was-pending/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬