कराडमध्ये काँग्रेसला धक्का, अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल

  |   Sataranews

कराड : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची गळती काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आता, यात कराडमधील अनेक नेत्यांची भर पडली आहे. यात काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना धक्का दिला आहे.

राज्याभरात भाजपमध्ये मेगाभरती सुरूच आहे. आता कराड सारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भाजपने खिंडार पाडून येथील अनेक नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती कमळ देण्यात त्यांना यश आले आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रतापसिंह पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक सुनील पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर. टी. स्वामी, अशोकराव भावके, विंगचे माजी सरपंच वसंतराव शिंदे, विजयनगरचे सरपंच सचिन मोहिते, उपसरपंच विश्वास पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या उंडाळेच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, गोवरेचे माजी उपसरपंच निसार मुल्ला, माजी नगरसेवक हरिभाऊ जोशी, आरपीआय अध्यक्ष आप्पासो गायकवाड, गोवरे सोसायटीचे चेअरमन सतीश पवार, गोवरे ग्रा.पं. सदस्य गणेश जाधव, मुंढेचे उपसरपंच भीमराव जमाले, गोवरे ग्रा.प सदस्य रशीद मुल्ला, पवारवाडीचे सरपंच लक्ष्मण धोत्रे, नितीन पाटील, विकास कुंभार, अभिजित पवार, रमेश जगताप, अवधूत डुबल, सागर डुबल, अर्जून हुबाले, आशिष माने, अमोल चव्हाण, प्रशांत चव्हाण, सचिन पवार, दिलीप पवार, डॉ. प्रकाश पाटील, चंद्रकांत शेवाळे, सुनिल जाधव, कुलदीप निकम, मारुती शेवाळे, उत्तमराव साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Former-satara-district-general-secretary-of-Congress-Pratap-Singh-Patil-enters-BJP/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Former-satara-district-general-secretary-of-Congress-Pratap-Singh-Patil-enters-BJP/

📲 Get Satara News on Whatsapp 💬