खानापूर : उमेदवार निश्चित; पक्ष अनिश्चित

  |   Sanglinews

खानापूर विधानसभा मतदार संघात कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांचेच महत्त्व अधिक आहे. परिणामी, इथे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या चार प्रमुख पक्षांपेक्षा कुठला नेता कोणत्या राजकीय पक्षाकडून लढणार, याला अधिक महत्त्व आले आहे.

विद्यमान आमदार अनिलराव बाबर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गट, गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक गटांचे स्वतंत्र सुभे निर्माण झाले आहेत. हेच गट गेल्या तीन निवडणुकांत एकमेकांशी लढताना दिसले आहेत. यावेळीही तेच होणार आहे.

मतदार संघात कधीकाळी बलवान असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सध्या दुबळे झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झाली आणि ही जागा राष्ट्रवादीला सोडली, तर विट्याचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मुळीक, आटपाडीचे रावसाहेब पाटील, दिघंचीचे हणमंतराव देशमुख इच्छुक आहेत. त्यातच लोकसभेला गोपीचंद पडळकर यांना या मतदार संघात मिळालेली मते लक्षात घेतली, तर वंचित बहुजन आघाडीचाही उमेदवार असण्याची मोठी शक्यता आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Candidate-Fixed-but-The-party-is-uncertain/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Candidate-Fixed-but-The-party-is-uncertain/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬