चला, संकटसमयी एकमेकांना हात देऊया

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

रस्त्याला महापुरुषांची नावे देणे सोपे असते, परंतु महापुरुषांनी सांगितलेल्या रस्त्यावर चालता आले पाहिजे. कर्मवीरअण्णांच्या कार्यामुळे बहुजनांच्या कित्येक पिढ्या मोठ्या झाल्या आहेत. संकटसमयी एकमेकांना हात देऊन त्यांना वर काढणे हा कर्मवीरअण्णांचा वारसा आपण जपला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कर्मवीरअण्णांची 132 वी जयंती व कर्मवीरभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अनासपुरे बोलत होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा अध्यक्षस्थानी होते. उद्योजक रवींद्र माणगावे यांना उद्योगभूषण, तर मिलिंदकुमार माळी यांना यावेळी कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनासपुरे म्हणाले, आपल्याकडे दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याच्या भावनेने नाम फाऊंडेशनची स्थापना झाली. त्याला आता बहुआयामी रुप आले आहे. महापुराचीही परिस्थिती गंभीर होती. अनेकांची मदत करत माणुसकी दाखवली. आता पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न गंभीर आहे. नाम फाऊंडेशनने 500 घरे बांधून देण्याचे ठरविले आहे. त्याची पूर्तता आम्ही करीत आहोत. महापूर ही केवळ निसर्गनिर्मित आपत्ती नव्हती, तर ती मानवनिर्मितही होती. त्यामुळे सर्वांनीची याचा विचार केला पाहिजे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Let-us-help-each-other-in-times-of-crisis-says-actor-Makarand-Anaspure-in-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Let-us-help-each-other-in-times-of-crisis-says-actor-Makarand-Anaspure-in-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬