जत : बोर्गीजवळ अपघातात एक ठार

  |   Sanglinews

जत : शहर प्रतिनिधी

उमदी विजापूर राष्ट्रीय महामार्गावर बोर्गी-बालगाव दरम्यान आयशर टेम्पो व मोटारसायकलच्या अपघातात ओंकार उमेश देसाई (वय १७, रा. बोर्गी ता. जत) हा महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.२३) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ओंकार देसाई हा बोर्गी येथील असून करजगी रस्त्याला त्याचे शेत आहे. तेथून तो त्याचे वर्गमित्र संतोष मल्लिकार्जुन अवजी व शिवमूर्ती शेखर पाटील मिळून दुचाकीवरुन(एमएच-13-एस-0620) उमदी महाविद्यालयात जात होते. रस्त्यात मालवाहतूक करणाऱ्या आयशरने (एमएच -42- एक्यू-3296) समोरून धडक दिल्याने तिघेही मोटरसायकलवरून खाली पडले.

यावेळी दुचाकी चालवत असलेल्या ओंकार देसाईच्‍या डोक्याला मार लागून डोक्यातून रक्तस्त्राव झाला त्‍यामुळे तो जागीच ठार झाला. त्याचे दोन्ही मित्र गंभीर जखमी झाले. त्यांना विजापूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/One-killed-and-two-injured-in-accident-near-Borgi/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/One-killed-and-two-injured-in-accident-near-Borgi/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬