पितृ पंधरवड्यात गॅस सिलिंडरची टंचाई

  |   Sataranews

सातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा जाणवत असून ग्रामीण भागात आठवड्यातून एक-दोनदा येणार्‍या सिलिंडर पुरवठा करणारी वाहने सुमारे महिनाभरापासून बंदच झाली आहेत. शहरातील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. दहा ते पंधरा दिवस अगोदर नंबर लावूनही सिलेंडर मिळत नाही. ऐन पितृ पंधरवड्यात म्हाळाच्या स्वयंपाकासाठी सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव— संताप आहे. एजन्सीचे कर्मचारी व नागरिकांत वादावादीचे प्रसंग उद्भवू लागले आहेत.

सातारा शहरासह जिल्ह्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. सुमारे दहा ते पंधरा दिवस सिलिंडरचे बुकिंग करुनही सिलिंडर उपलब्ध होत नाही. ग्रामीण भागात आठवड्यातून एक ते दोनदा घरपोच सिलिंडर पोहोचवणारी वाहने येणेच बंद झाले आहे. गॅस सिलिंडरचे बुकिंग करणारे दिवसभर सिलिंडर रस्त्यावर ठेऊन वाहन येण्याची वाट बघतात. कंटाळून एजन्सीमध्ये फोन करुन गाडी येणार आहे का? अशी विचारणा केली असता इथे सिलिंडरच शिल्‍लक नाहीत तर वाहन कसे पाठविणार? अशी उत्तरे दिली जात आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/The-gas-cylinder-shortage-in-the-pitru-pandharvada/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/The-gas-cylinder-shortage-in-the-pitru-pandharvada/

📲 Get Satara News on Whatsapp 💬