'भाजपाच्या बाजूने लढणारा कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढतोय'

  |   Maharashtranews

पुणे : भाजपच्या बाजूने लढाई लढत असलेला कार्यकर्ता राष्ट्रभक्तीची लढाई लढत असल्याचे विधान भाजपा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. देश आणि समाजाला बळकट करणारी लढाई आपण लढत आहोत. विरोधी पक्षातील निम्मे नेते एकतर जेलमध्ये आहेत नाहीतर बेलवर ( जामिनावर ) आहेत असेही ते म्हणाले. पुण्यात भाजपा विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे भाजपच्या पश्चिम माहाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकले गेले. भाजपचे सहसंघटन मंत्री व्ही सतीश, खासदार गिरिश बापट, भाजपात नुकतेच प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासह सर्व आमदार या कार्यक्रमात उपस्थित होते.

कधीकाळी पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस - राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आज तो भाजपचा बालेकिल्ला झाला. निवडणूक ही हवेवर जिंकता येत नाही. आम्ही जोडतोडीऐवजी केलेल्या कामाच्या आधारावर निवडणूक लढतो असे नड्डा म्हणाले. देशात २३०० राजकीय पक्ष आहेत, त्यातील ७ राष्ट्रीय तर ६९ राज्य पातळीवरील पक्ष आहेत. इतर पक्ष व्यक्तीत अथवा कौटुंबिक पक्ष आहेत. या सगळ्यांत खरी लोकशाही केवळ भाजपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले....

फोटो - http://v.duta.us/B1v7BQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/rR_X9AAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬