लातूरवर मोठे जलसंकट; पुन्हा सुरु होणार टँकरने पाणीपुरवठा

  |   Maharashtranews

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहराचा नळाने होणार पाणी पुरवठा एक ऑक्टोबरपासून बंद होऊन लातूरला टँकरने पाणी पुरवठा होणार होता. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रशासनाने यात बदल केला आहे.

आता एक नोव्हेंबरपासून लातूरचा नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा हा अनिश्चित काळापर्यंत बंद होऊन लातूरला टँकरने पाणी वितरित केले जाणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी हा बदल जाहीर केला आहे. त्यामुळे लातूरकरांना काही अंशी का होईना दिलासा मिळणार आहे.

लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धनेगव येथील मांजरा धरणात सध्या ०४.५ दलघमी इतका मृतसाठ्यातील पाणीसाठा शिल्लक आहे. कारण धरण क्षेत्रात अजूनही मोठा पाणीसाठा करणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे लातूरवर मोठे जलसंकट घोंगावत आहे....

फोटो - http://v.duta.us/RpOQ1QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P3QHZgAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬