सर्वोपचार रुग्णालयात व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर!

  |   Akolanews

अकोला: सर्वोपचार रुग्णालयात विषबाधेसह इतर गंभीर रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. अत्यावश्यक परिस्थितीत अशा रुग्णांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात येते; परंतु उपलब्ध खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. हा प्रकार रुग्णांसाठी घातक ठरत आहे.

गत दीड दोन महिन्यांपासून फवारणीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना अतिदक्षता कक्षात दाखल केले जाते. मागील काही दिवसांत येथे दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येथे येणाºया नवीन रुग्णांना खाटाच उपलब्ध नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रुग्णांसाठी खाटांची अंतर्गत व्यवस्था केली, तरी त्यांना व्हेंटिलेटरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने नातेवाइकांकडून नेहमीच गोंधळ घालण्यात येतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. अकोल्यात दोन मंत्री असूनही आरोग्य सेवेची ही परिस्थिती चिंताजनक आहे....

फोटो - http://v.duta.us/BUgTYwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/sqYiJwEA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬