‘सेल्फी पॉईंट’ कराडची बनतेय नवी ओळख

  |   Sataranews

कराड : प्रतिभा राजे

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ, कृष्णाकाठ व प्रीतीसंगम बाग अशी ओळख असणार्‍या कराड शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला. शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिका कार्यरत असतानाच ‘आय लव्ह कराड’, पालिकेत बसविण्यात आलेले ‘राजहंस’, बारा डबरी परिसरातील ‘फुलांचे उद्यान’ ही नागरिकांसाठी सेल्फी पाँईट होत आहे तर विजय दिवस समारोहच्यावतीने युवकांसाठी प्रेरणादायी असणारे सैन्यदलाच्या वायूसेनेचे विमान आणि रशियन बनावटीचा रणगाडा नागरिकांना भुरळ घालत आहेत. त्यामुळे कराडची ओळख ‘सेल्फी पॉईंट असणारे शहर’ म्हणून भविष्यात होईल.

कराड शहरामध्ये स्वच्छतेची चळवळ सुरू झाल्यावर पालिकेने शहरातील कोपरा अन् कोपरा स्वच्छ कसा राहिल याकडे लक्ष दिले. तसेच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करून त्यापासून शोभिवंत वस्तू बनू शकतात याचा आदर्श नगरपालिकेच्या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी घालून दिला. त्यामुळेच कराड पालिकेच्या आवारात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून राजहंस बसविण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेच्या सौंदर्यात भर पडत आहेच परंतु त्याठिकाणी सेल्फी काढण्याचा मोहही नागरिकांना होत आहे. पालिकेत नेहमीच नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे ये — जा करणारे नागरिक याठिकाणी आवर्जून थांबत सेल्फी घेत असल्याचे दिसून येते. कचर्‍यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती करीत असताना पालिकेने कचरा कुंडीचे सुंदर उद्यान तयार केले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/-Selfie-Point-Karad-is-becoming-a-new-identity/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/-Selfie-Point-Karad-is-becoming-a-new-identity/

📲 Get Satara News on Whatsapp 💬