[ahmednagar] - आंदोलनाच्या दणक्याने रस्त्यातील रोहित्र हटवले

  |   Ahmednagarnews

'जागरूक'च्या मागणीची महापालिका व महावितरणकडून दखल

म. टा. प्रतिनिधी, नगर

रेल्वे स्टेशन रस्त्यावर सीना नदीवरील नवीन सिमेंट पुलाच्या कामास अडथळा ठरणारे विद्युत रोहित्र (डीपी) हटवण्याचे काम सुरू झाले आहे. जागरूक नागरिक मंचाने यासाठी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन महापालिका व 'महावितरण'द्वारे रोहित्र रस्त्यातून काढून रस्त्याच्या कडेला उभारण्याचे काम सुरू झाले आहे.

रेल्वे स्टेशन रस्त्यावर सीना नदीवर असलेल्या लोखंडी पुलाशेजारी सुमारे ८ कोटी रुपये खर्चून महापालिकेद्वारे सिमेंटचा पूल केला जात आहे. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पण पुलावरून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या रोहित्राने (डीपी) वाहतुकीस अडथळा येणार होता. त्यामुळे ते तातडीने हटवण्याची मागणी जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे व अन्य सदस्यांनी केली होती. यासाठी पुलावर आंदोलन करून तसेच तेथील रोहित्राला चपलाचा हार घालून 'मृतात्मा पूल' असे नामकरणही केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने संबंधित रोहित्र हटवण्याचे काम सुरू झाले. तशी माहिती जागरूक नागरिक मंचाला नुकतीच देण्यात आली. चार नवीन खांब, त्यांच्यासाठी खड्डे व काँक्रिटसह क्रेन आणून युद्धपातळीवर रोहित्र हटवण्याचे व लगेच ते दुसरीकडे बसवण्याचे काम केले जाणार असल्याचे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले होते व तशी कृती झाल्याचे मुळे यांनी सांगितले. दरम्यान, दसऱ्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल व त्या वेळी पहिली गाडी जागरूक नागरिक मंचाची असेल, असेही आश्वासन महापौर वाकळेंनी दिल्याचे मुळेंनी सांगितले.

फोटो - http://v.duta.us/xW00TgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_NgzTwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬