[ahmednagar] - चार मतदारसंघात तीन लाखांहून अधिक मतदार

  |   Ahmednagarnews

३४ लाख ६८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

म. टा. प्रतिनिधी, नगर

विधानसभा निडवणुकीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून ३४ लाख ६८ हजार ५२२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कर्जत-जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव आणि पारनेर या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारी मतदारांची संख्या तीन लाखांच्या पुढे असल्याने या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जिल्ह्यामध्ये अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा व कर्जत-जामखेड हे बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघांतील मतदारांची अंतिम यादी तयारी झाली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ३४ लाख ६८ हजार ५२२ मतदार असून त्यामध्ये १८ लाख ५ हजार ५२६ पुरुष मतदार, १६ लाख ६२ हजार ८३४ महिला मतदार व १६२ इतर मतदार आहेत. शेवगाव मतदारसंघातील मतदारांची संख्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. या मतदारसंघात एकूण ३ लाख ४० हजार ३९० मतदार आहेत. तर, सर्वांत कमी मतदार अकोले तालुक्यात आहेत. या तालुक्यातील मतदारांची संख्या २ लाख ५३ हजार ९६९ आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/F1wAKAAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬