[ahmednagar] - जुन्या संचमान्यतेच्या निकषांना स्थगिती

  |   Ahmednagarnews

नगर : संचमान्यतेत सुधार होईपर्यंत तात्पुरती जुन्या संचमान्यतेच्या निकषांना स्थगिती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती. यास प्रतिसाद देऊन जुन्या संचमान्यतेच्या निकषांना स्थगिती दिल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. महाराष्ट्र शिक्षक परिषदेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आले आहे.

शाळांतील जुन्या संचमान्यतेत अनेक त्रुटी आहेत. तसेच संचमान्यतेत शिक्षक पदे दिली जात नसल्याची बाब शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी शिक्षक आमदार ना. गो. गाणार, भगवानराव सांळुखे, राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, शिवनाथ दराडे, प्रकाशचंद्र मिश्रा, भरत काकड आदी उपस्थित होते. त्यामुळे संचमान्यतेतील त्रुटी जोपर्यंत दूर केल्या जात नाहीत तोपर्यंत नवीन संचमान्यता लागू करू नये, अशी मागणी परिषदेच्या वतीने करण्यात आली होती. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन जुन्या संचमान्यतेच्या निकषांना स्थगिती दिली आहे. आता जुन्या निकषांप्रमाणे २०१९-२० ची संचमान्यता होणार नाही. यावर्षी संचमान्यतेस स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे या वेळी कोणीही शिक्षक अतिरिक्त होणार नाही.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uP_8fwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬