[ahmednagar] - ‘सी-व्हिजिल’ कक्ष सुरू

  |   Ahmednagarnews

नगर : आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत मतदारांना तक्रार करता यावी, यासाठी विकसित केलेल्या 'सी-व्हिजिल'(C-Vigil) अॅपवर तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 'सी-व्हिजिल' कक्ष देखील सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या अॅपचा वापर करून रविवारी (२२ सप्टेंबर) दुपारी दोन वाजेपर्यंत एक तक्रार प्राप्त झाली होती, अशी माहिती 'सी-व्हिजिल' कक्षातून देण्यात आली.

निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट मतदारांनाच या प्रक्रियेत सामावून घेतले आहे. त्यासाठी आयोगाने 'सी-व्हिजिल' 'अॅप' विकसित केली आहेत. 'सी-व्हिजिल'वर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबतच्या तक्रारी मतदारांना करता येणार आहेत. या अॅपवर करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर संबंधित तक्रार निकाली निघावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये 'सी-व्हिजिल' कक्ष सुरू करण्यात आला आहे. मतदाराने अॅपवर केलेल्या तक्रारीचे स्वरुप, तक्रारी कोणत्या भागातील आहे ते स्थळ, याबाबतची माहिती या कक्षामध्ये प्राप्त होत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून रविवारी दुपारी दोनवाजेपर्यंत या अॅपद्वारे केवळ एकच तक्रार प्राप्त झाली असल्याची या कक्षातून देण्यात आली आहे.

फोटो - http://v.duta.us/cRP-QAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/w4A78wAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬