[aurangabad-maharashtra] - ऑरिक सिटीच्या पुलासाठी रेल्वे ब्लॉक

  |   Aurangabad-Maharashtranews

औरंगाबाद : शेंद्रा डीएमआयसी ऑरिक सिटीला जोडण्यासाठी करमाड -चिकलठाणा दरम्यान रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या पुलाच्या कामासाठी सहा दिवसांचा रेल्वे लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

शेंद्रा डीएमआयसी येथील ऑरिक हॉलचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ही औद्योगिक वसाहत आणि औरंगाबाद शहराला जोडणारा करमाड आणि चिकलठाणा रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या रेल्वे उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी नियोजित जागेवर स्टील गर्डर टाकण्यात येणार आहेत. हे काम करताना, कोणतीही हानी होऊ नये यासाठी सहा दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक २५, २६, २७ आणि २८ सप्टेंबर, असा पहिल्या चार दिवसांसाठी आहे. त्यानंतर २ आणि ३ ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सहा दिवसांत अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस १७ मिनिटे आणि औरंगाबाद-नांदेड विशेष रेल्वे गाडी २६ मिनिटे उशिरा धावणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3CPMwwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬