[aurangabad-maharashtra] - ‘राकाज्’ला पुन्हा संधी देण्याचा खटाटोप

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

पोलिसांच्या परवानगी शिवाय हुक्का पार्लर सुरू करण्यावरून वादग्रस्त ठरलेल्या ज्योतीनगर येथील राकाज हेल्थ क्लबवरून महापालिकेतील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. न्यायालयाचा निकाल विरोधात असताना सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा त्यांना ताबा देण्याचा खटाटोप सुरू केला आहे, तर भाजप गटनेत्यांनी निकालास वरिष्ठ न्यायालयात आव्हान द्यावे, यासाठी आयुक्तांना पत्र दिले आहे.

ज्योतीनगर येथील राकाज् हेल्थ क्लबचे प्रकरण मार्गी लावण्यावरून शिवसेना-भाजप संघर्ष समोर आला आहे. वादग्रस्त राकाज् हेल्थ क्लबवरून न्यायालयात वाद सुरू आहे. तो निकाल महापालिकेच्या विरोधात गेल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर जागेचा ताबा कंत्राटदाराला देण्यासाठी शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी कंत्राटदारासह नुकतीच महापौरांची भेट घेतल्याचेही चर्चा आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून तशा हालचाली सुरू होताच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी या प्रकरणावरून आयुक्तांना पत्र लिहून या निकालास पालिकेने वरिष्ठ न्यायालयात आव्हान द्यावे, हा हेल्थ क्लब पालिकेमार्फतच चालवावा, अशी मागणी केली आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाची प्रत माझ्याकडे आलेली नाही, ती आल्यानंतर उत्तर देवू....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/m1qrdwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬