[aurangabad-maharashtra] - शुल्कातील फरकाची रक्कम परत मिळणार

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

'एसईबीसी' (आर्थिक व सामाजिक मागास) आणि 'ईडब्ल्यूएस' (आर्थिकदृष्ट्या दुर्बल) या कोट्यामुळे खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या परिणाम झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्रवेश मिळू न शकल्याने खासगी वैद्यकीय कॉलेजांत प्रवेश घ्यावा लागलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कातील फरकाची रक्कम परत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ने याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता, असेही सरकारने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

राज्यात 'एसईबीसी' आणि 'ईडब्ल्यूएस' यांच्या कोट्यांमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत खुल्या प्रवर्गातील काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. सर्वसाधारण खुल्या गटातील उच्च गुणवत्ताप्राप्त वैद्यकीय विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे सांगत 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ने आवाज उठवला होता. या विद्यार्थ्यांना लाभ मिळायला हवा, अशी मागणी 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन'ने केली होती. त्या मागणीची पूर्तता राज्य शासनाने केली आहे. दोन्ही शुल्कातील तफावत लक्षात घेऊन ते परत करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने एक परिपत्रक काढून आपला निर्णय जाहीर केला. परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अशा दोन्ही वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या अशा विद्यार्थ्यांच्या शासकीय आणि खासगी महाविद्यालयांच्या शुल्कातील फरकाची रक्कम विद्यार्थ्यांना परत करणार आहे. त्यानुसार 'एमबीबीएस', 'बीडीएस', 'एमडी', 'एमएस' आणि 'एमडीएस'च्या ज्या विद्यार्थ्यांना २०१९-२०२०साठी नवीन आरक्षणामुळे प्रवेश मिळू शकला नाही, त्यांना त्यांनी भरलेल्या शुल्कातील फरकाचा परतावा मिळेल आणि तो त्यांच्यासाठी पुढील वर्गांसाठीही असेल....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/JQVsOwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬