[aurangabad-maharashtra] - ‘शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीसोबतच’

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ऐन विधानसभ निवडणुकीच्या तोंडावर अनेक बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. या कठीण काळात वयाच्या ७९ व्या वर्षी पक्षाची पडझड रोखत निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दौरे करत आहेत. त्यांच्या सभांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद येथेही अशाच एका भारावून गेलेल्या संशोधक विद्यार्थी दादाराव कांबळे यांनी शंभर रुपयांच्या बॉण्डवर 'मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राहील,' असे शरद पवार यांना लिहून दिले. या प्रकारामुळे थक्क झालेल्या शरद पवारांनी विद्यार्थ्याच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला.

'मी काय म्हातारा झालो का,' अशा शब्दांत कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून शरद पवारांनी तरुणांना घातलेली साद सगळ्यांना भावली आणि 'साहेब आम्ही तुमच्या सोबतच आहोत' अशी ग्वाही युवकांनी पवारांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. उल्हास उढाण म्हणाले की, २० सप्टेंबर रोजी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यास विद्यार्थी-युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रचंड गर्दीमुळे अनेकांना पवार यांना भेटण्याची इच्छा असूनही भेटता आले नाही. पवार यांचा मुक्काम असल्याचे समजताच अनेकांनी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी धाव घेतली. हॉटेललाही मोठी गर्दी झाली. सुरक्षेच्या कारणामुळे तेथे अनेक विद्यार्थ्यांची भेट झालीच नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, आम्हाला पवार साहेबांना भेटून आमच्या भावना व्यक्त करावयाच्या असल्याचे सांगितले. यानंतर डॉ. उढाण यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवार यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. यानंतर पवार हे तत्काळ हॉटेलच्या मिटिंग हॉल दाखल झाले. शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांची भेट घेत भावना व्यक्त केल्याचे उढाण यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/49VpJwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/W1ESMwAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬