[aurangabad-maharashtra] - सव्वालाखाची चोरी; दोघांना अटक, कोठडी

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

घरफोडी करुन सव्वालाखाचा ऐवज चोरल्याप्रकरणी आरोपी शेख अरबाज शेख नब्बू व फारुख शहा शब्बीर शहा या दोघांना शनिवारी (२१ सप्टेंबर) रात्री अटक करण्यात आली. दोघा आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना बुधवारपर्यंत (२५ सप्टेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. डी. सुंगारे यांनी दिले.

या प्रकरणी संतोष नागनाथ हेकडे (३६, रा. माळीवाडा, ता. जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी व त्याचे कुटुंब जेवण करून घरात झोपले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कपाटात ठवलेले सोन्याचे दागिने व रोख एक लाख रुपये, असा सुमारे १ लाख २१ हजार ५३० रुपयांचा ऐवज लंपास केला. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी शेख अरबाज (२०, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) व फारुख शहा (२०, रा. अब्दीमंडी ता. जि. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरी केलेला ऐवज हस्तगत करणे, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती यांनी न्यायालयात केली. ही विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/X1EiZAAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬