[kolhapur] - टीपीतील कारभारावर शिवसेनेचे ताशेरे

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील खराब रस्ते आणि नगररचना (टीपी) विभागातील भ्रष्ट साखळीचा पाढा शिवसेनेच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासमोर वाचण्यात आला. सामान्य नागरिकांची टीपीतील अधिकारी गळचेपी करत असल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने निदर्शनास आणून देत मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळाचे नेतृत्व आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.

निवेदनात म्हटले आहे, 'शहरातील नेहमीच रस्त्यांची दुरवस्था झालेली दिसते. रस्ते खराब होण्यास अतिवृष्टीचे कारण पुढे केले जात असले, तरी त्याला भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. ठेकेदारांशी संगनमत करुन त्यांनी रस्त्यांची नेहमीच वाट लावली आहे. त्याचबरोबर टीपीमधील अधिकारी फाइलवर पैसे ठेवल्याशिवाय काम करत नाहीत. भ्रष्टाचार उघडून काढण्यासाठी पवडी व टीपीतील अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी करुन त्याचा अहवाल संबंधीत विभागाला पाठवा. तसेच एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा.'...

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/cR--oQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬