[kolhapur] - प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करा

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

'पुढील महिन्यापासून संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे. प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र करताना प्रत्येक आरोग्य निरीक्षकांनी दररोज किमान पाच व्यावसायिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. निश्चित केलेल्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यास दंडात्मक कारवाई करावी.' अशी सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. अॅटो टिपरमधून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्याची नोंद ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या बैठकीत दिले.

आयुक्त कलशेट्टी म्हणाले, '१०४ अॅटो टिपरद्वारे पूर्ण क्षमतेने प्रभागातील ओला व सुका कचरा संकलत करणे, आयीसी टीमने कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. स्वच्छ भारत मिशन जनजागृती करताना टिपर पूर्ण क्षमतेने कचरा भरुन वाहतूक करतात की नाही याच्या नोंदी आरोग्य निरीक्षकांनी ठेवाव्यात. प्लास्टिक प्रतिबंधक मोहीम राबवताना पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करण्यात येऊ नये. मटण-चिकन दुकानासमोर भटकी कुत्री अढळून आल्यास संबंधीत व्यवसायिकावर ५०० रुपयांचा दंड आकारावा. तसेच वॉर्डनिहाय दहा ठिकाणांच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत. कचरा गोळा करण्यासाठी डस्टबीन ठेवावेत. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी' अशी सूचना त्यांनी आरोग्याधिकारी यांनी केल्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/mLe7eAAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬