[kolhapur] - ‘प्लास्टिक वापर टाळा, अन्यथा दंड’

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हार, बुके व फेरीवाल्यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा अन्यथा सरकारच्या निर्देशानुसार दंडात्मक कारवाई करणात येईल,' असा इशारा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिला. फुल विक्रेते व फेरीवाल्यांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. 'अनेक फुल व फळे विक्रेते प्लास्टिक व नॉन व्होअन बॅगचा वापर करतात. प्लास्टिक पर्यावरणाला अत्यंत घातक असून त्यावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर केल्यास प्रथम पाच हजार नंतर दहा हजाराचा दंड करण्यात येईल. तसेच तिसऱ्यावेळी २५ हजारांचा दंड करताना गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.' असे आयुक्तांनी सांगितले. बैठकीस आरोग्याधिकरी डॉ. दिलीप पाटील, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/3eBapgAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬