[kolhapur] - भाज्या पाच रुपयांनी महागल्या

  |   Kolhapurnews

कोल्हापूर टाइम्स टीम

भाजी मंडयात भाज्यांची मोठी आवक झाली असून पितृ पंधरवड्यामुळे भेंडी, दोडका, गवारी, चवळी शेंग, काळ्या बियांचा घेवडा, मोहोर यांना मोठी मागणी असून या भाज्यांच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांनी वाढ झाली आहे.

पितृ पंधरवडा निम्म्यावर आला असून आठवडाभर महालय सुरू राहणार आहेत. भाज्यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. कांद्याची आवक घटल्याने दर ५० ते ५५ रुपयांवर स्थिर आहे. लसूण प्रतिकिलो २०० ते २२० रुपये दर कायम आहे. भेंडी, दोडक्याचा दर प्रतिकिलो साठ ते ८० रुपये असून गवार, चवळी शेंग, काळ्या बियांचा घेवडा, श्रावण घेवड्याचा दर प्रतिकिलो ८० रुपये आहे. कोबी गड्ड्याच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. १५ ते ३० रुपये कोबी गड्ड्याचा दर आहे. फ्लॉवर गड्ड्याचा दर २० ते ४० रुपये असून टोमॅटोचा दर प्रतिकिलो १० ते २० रुपये दर होता. पालेभाज्यांची आवक मोठी झाली असून मेथी, पोकळा, कोथंबिर, शेपू, पालक, करडा पेंडीचे दर १० रुपये होता. सफरचंद, डाळिंबाची आवक झाली असून सफरचंदाचा दर प्रतिकिलो १०० ते १५० रुपये इतका आहे. डाळिंबा दर प्रतिकिलो ३० ते ८० रुपये असून ग्राहकांची फळांना मागणी वाढली आहे. पेरु, मोसंबीचे बाजारात आगमन झाले आहे....

फोटो - http://v.duta.us/6da77QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/tfuPOQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬