[kolhapur] - मंदिरात सफाईला वेग

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. स्वच्छतेबरोबर दर्शन मंडपाची उभारणी सुरू असून मंगळवारी देवीच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता केली जाणार आहे. रविवारपासून (ता. २९) नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे.

अंबाबाई मंदिरात जोरदार स्वच्छता मोहीम सुरू असून शिखरांची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. आज रविवारी गणपती चौक, सरस्वती चौक, महाकाली चौकाची स्वच्छता करण्यात आली. सरलष्कर भवन, भवानी मंडप शेतकरी बझार या ठिकाणी दर्शन मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गावरही मंडप घालण्यात येत आहे.

मंगळवारी गरूड मंडपात सराफ व्यावसायिकांकडून देवीच्या पारंपरिक दागिन्यांची स्वच्छता करून घेतली जाणार आहे. तसेच गुरुवारीही काही दागिन्यांची स्वच्छता केली जाणार असून बुधवारी (ता.२५) अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी दर्शन बंद राहणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/O62mXQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬