[kolhapur] - १११८ परवानाधारी शस्त्रेजमा करण्याचे आदेश

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्षातील प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कालावधीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी स्वसंरक्षणाठी वापरत असलेले १११८ परवानाधारी शस्त्रे रविवारपासून जमा करून घ्यावीत', असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा पोलिस प्रशासनास दिला आहे. यासंबंधीचे पत्र जिल्हा पोलिस प्रमुख प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनाही देण्यात आले आहे.

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी डोंगरालगतच्या शेतकऱ्यांना बंदूक वापरण्याचा परवाना दिला जातो. याशिवाय विविध कारणांनी जिवाला धोका असलेल्या काही जणांनाही असा परवाना देण्यात आला आहे. अशा एकूण ७ हजार ३८१ जणांना बंदूक वापरण्याचा परवाना प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक काळात बंदूकीचा धाक दाखवून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने १११८ जणांकडून शस्त्रे जमा करून घेण्याचा निर्णय घेतला. संबंधितांना पोलिस ठाण्यातील पोलिसामार्फत गावच्या पोलिस पाटलांकडून निरोप पोहचवण्यात येत आहे. निरोप देऊनही बंदूक जमा न केल्यास पोलिस निरीक्षकांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर करावी, असा आदेशही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_MNRRQAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬