[kolhapur] - ११ हजारांवर प्रचार फलक हटवले

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विविध पक्ष,लोकप्रतिनिधींची प्रचार, प्रसिद्धीचे फलक निवडणूक प्रशासनातर्फे हटवण्याची मोहीम राबविली. आचारसंहिता लागू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शहर आणि जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात व्यापक मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये फलक, भिंती, पोस्टर्स, बॅनर्स, इतर असे ११ हजार, २१९ प्रचार फलक हटवण्यात आले.

विकास कामांच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या नावांचा फलक असतो. जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांची नावे असतात. पक्ष, उमेदवारांचे गुणगाण करणारे फलक, बॅनर्स लावलेले असतात. भिंतीवरही अप्रत्यक्षपणे प्रचार होईल, असे रंगकाम केले जाते. हे सर्व आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे हटवले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनातर्फे ही कार्यवाही केली जात आहे. न काढण्यात येणाऱ्या फलकांवर कागद किंवा कापड लावले आहे. तात्पुरत्या स्वरुपाचे फलक उतरवण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणचे ८ हजार, ७४ आणि खासगी मालमत्तेवरील ३ हजार, १४५ ठिकाणचे फलक काढण्यात आले. आतापर्यंत असे सर्वाधिक फलक राधानगरी विधानसभा मतदारसंघात करण्यात आली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/I3UXcwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬