[mumbai] - अँकर म्हणाली,आदित्य ठाकरे 'शिवसेनेचा राहुल गांधी'!

  |   Mumbainews

मुंबई: एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात महिला अँकर अंजना ओम कश्यपनं युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'शिवसेनेचे राहुल गांधी' असा उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर अँकर अंजनानं ट्विटरद्वारे खेद व्यक्त केला असला तरी, वातावरण अद्याप तापलेलंच आहे.

वृत्तवाहिनीवर चर्चासत्राचं थेट प्रक्षेपण सुरू होतं. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बाईट घ्या असं मी म्हणाले होते...हा शिवसेनेचा राहुल गांधी सिद्ध होईल हे लिहून घ्या,' असं अँकर अंजना बोलत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अंजनावर टीका होत आहे. त्यानंतर अंजनानं ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. ही माझी वैयक्तिक प्रतिक्रिया होती. त्याचा वृत्तवाहिनीशी कोणताही संबंध नाही, असं ती म्हणाली. मात्र, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी अंजनाचं नाव न घेता कठोर शब्दांत टीका केली आहे. 'कोण काय सिद्ध होईल हे वेळच निश्चित करेल. पण काही लोक तर आधीच विकले गेलेत हे सिद्ध झालं आहे. पत्रकारितेवर लक्ष केंद्रीत करा, भविष्यवाणी तर पोपटही पैसे घेऊन करतो,' असा टोला त्यांनी लगावला आहे.

फोटो - http://v.duta.us/9Om3hwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/xCdf_QAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬