[mumbai] - अमित शहांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांची तिरकस टीका

  |   Mumbainews

मुंबई: 'राज्यात पूर्ण बहुमतानं भाजपचंच सरकार येणार, हे भाजपाध्यक्ष अमित शहा यांचं वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलंच खटकलं आहे. शहांच्या या वक्तव्याचा उद्धव यांनी अप्रत्यक्षपणे समाचार घेतला आहे. 'महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका ही केवळ औपचारिकताच उरली आहे. लोकांनी फक्त बटण दाबायचे आहे, दुसरे काय?,' असं उद्धव यांनी म्हटलं आहे.

मुंबई भाजपच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना शहा यांनी राज्यात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार येईल, असा दावा रविवारी केला होता. फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही त्यांनी म्हटलं होतं. एकीकडं युतीची चर्चा सुरू असताना शहा यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं शिवसेनेत अस्वस्थता पसरली. उद्धव यांनी 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून या मुद्द्यावर तिरकस भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्याच्या भाजपच्या रणनीतीवरही त्यांनी टीका केली आहे. 'राष्ट्रीय प्रश्नांची एक नशा असते. त्यापुढं इतर विषय गौण ठरतात. राज्यांच्या प्रश्नांवर नंतर केव्हाही बोलता येईल, असं सध्याचं वातावरण आहे. महाराष्ट्रात आता कोणतेच प्रश्न शिल्लक नाहीत, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. असा आत्मविश्वास याआधी कोणत्याही पक्षानं दाखवला नव्हता. भाजपकडं हा आत्मविश्वास आहे, त्याचा आम्हाला आनंदच आहे,' असा टोला उद्धव यांनी लगावलाय....

फोटो - http://v.duta.us/f89ySQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DiukFwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬