[mumbai] - ‘बेस्ट दिवाळी बोनस’ला आचारसंहितेचा फटका

  |   Mumbainews

मुंबई: 'बेस्ट'मधील कामगार-कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी नऊ हजार १०० रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा शुक्रवारी बेस्ट प्रशासनाने केली असली तरी बेस्ट समितीच्या बैठकीत हा विषय मांडून अंतिम मान्यता मिळालेली नव्हती. त्यातच शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे आता अंतिम मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाचीही संमती घेणे आवश्यक असल्याने बोनस वाटपाच्या अंमलबजावणीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मागील दोन वर्षांत अपेक्षेप्रमाणे दिवाळी बोनस न मिळाल्याने हिरमोड झालेल्या बेस्ट कामगार-कर्मचाऱ्यांना यंदा बेस्ट प्रशासनाने दिलासा दिला. चांगल्या रकमेचा बोनस देण्याचा निर्णय बेस्ट व्यवस्थापनाने शुक्रवारी जाहीर केला. मात्र, बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्याला अंतिम मान्यता घेणे आवश्यक असते. त्यानुसार, शनिवारी बेस्ट समितीच्या सदस्यांना दिवाळी बोनसचा प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, शनिवारीच निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. आता बेस्ट समितीच्या बैठकीत अंतिम मान्यता देण्यात आली तरी त्याला निवडणूक आयोगाचीही संमती घेणे आवश्यक ठरणार आहे. परिणामी प्रत्यक्षात बोनस वाटप कधी होणार याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने 'बेस्ट'च्या सुमारे ४१ हजार कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे....

फोटो - http://v.duta.us/_dxw8gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HNUSKgAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬