[mumbai] - मरीन ड्राइव्हला महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह

  |   Mumbainews

मुंबई:

मुंबई महानगरपालिकेने पुण्याच्या धर्तीवर महिलांसाठी 'ती' स्वच्छतागृह सुरू केले आहे. एका जुन्या बसचं रुपांतर टॉयलेटमध्ये केले असून या स्वच्छतागृहात वायफाय आणि टिव्हीसारख्या सुविधादेखील आहेत. मुंबईतलं हे पहिलं 'ती' टॉयलेट मरीन ड्राइव्ह रेल्वे स्थानकाजवळ सुरू करण्यात आलं आहे.

वायफाय असलेल्या टीव्ही स्क्रीन्ससह एक डिजीटल फीडबॅक मशीनही या स्वच्छतागृहात आहे. पॅनिक बटण, सॅनिटरी नॅपकीन डिस्पेन्सर, सोलार लाइट्स, ब्रेस्टफिडींग स्टेशन अशा अनेक सुविधा महिलांना या ती टॉयलेटमध्ये मिळणार आहेत.

पुण्याची ती टॉयलेट बनवणारी कंपनी सारा प्लास्ट इंडिया लिमिटेडशी मुंबई महापालिकेने ९ सप्टेंबर रोजी संपर्क साधला. पालिकेने काही अटीही ठेवल्या होत्या. उदाहरणार्थ, या टॉयलेटची जागा, पाणी, वीजेची व्यवस्था पालिका करेल, एक वर्षापर्यंत या टॉयलेटचा खर्च पालिका उचलेल. ड्रेनेज लाईनही पालिकेची असेल. या टॉयलेटला पे अँड यूज मॉडेलप्रमाणे चालवलं जावं आणि प्रति महिला ५ रु. शुल्क आकारलं जावं याची परवानगी पालिका देईल....

फोटो - http://v.duta.us/v1esYAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/O2MSiAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬