[nagpur] - अल्पसंख्यकांना १५ जागा मिळणार

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, अकोला

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ जागा लढून उर्वरित ३८ मित्र पक्षांना देणार आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमधील १५ जागा अल्पसंख्यकांना दिल्या जातील. त्यातील अकोला पश्चिमची एक जागा राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अॅड. माजीद मेमन यांनी दिली.

अकोला येथे रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अॅड. मेमन आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकार जनतेच्या प्रश्नांपासून दूर गेले आहेत. सामान्यांच्या व्यथांचे त्यांना काहीही घेणे-देणे नाही. फारच आग्रह झाला तर ते काही प्रकरणांची चौकशी लावतात. पुढे त्याचे काय झाले हे सादर करीत नाहीत. चौकशी हा या सरकारसाठी टिंगल-टवाळकीचा मुद्दा बनला आहे. केवळ सोयीची भूमिका घ्यायची आणि आपल्या सहकाऱ्याचा बचाव करायचा, असे केंद्र व राज्य सरकारचे धोरण असल्याचा टोलाही मेमन यांनी लगावला आहे. पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अजूनही न्याय मिळालेला नाही. त्याबाबत जुलैच्या संसद अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. हल्ला का झाला? मानवी बॉम्ब असलेला हल्लेखोर नेमका त्याच दिवशी व त्याच वेळी जवानांच्या गाड्यांमध्ये कसा शिरला, त्या वाहनांमध्ये नेमके जवानच आहे, हे त्याला कसे कळले हे माझे मुद्दे होते. मुळात हे मुद्दे चौकशीसाठी गठीत राष्ट्रीय तपास पथकापुढे (एनआयए) आलेही असतील. परंतु त्या पथकाचा चौकशी अहवाल पुढे आला नाही. माझे निवेदन संपल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात उभे झाले. ते याबाबतची सविस्तर मांडणी करतील, असे वाटले. परंतु हा मुद्दा गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो, असे सांगून खाली बसले. केंद्र सरकारची संवेदना बोथट झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला....

फोटो - http://v.duta.us/4GGM8gAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QGOsqwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬