[nagpur] - अवैध मद्यविक्रीत काळा गूळ

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

अवैध दारू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात काळ्या गुळाचा वापर होत असल्याचे पुन्हा पुढे आले आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाची संयुक्त कारवाईत काळ्या गुळासह इतर साहित्य असा एकूण साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गिट्टीखदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील भिवसनखोरी येथे दारूबंदी कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईत ५ लाख ३१ हजार ३७५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला. उपायुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्त्वात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दारुबंदी गुन्ह्यातील हातभट्टी दारू २०० लिटर, काळा गुळ १००० किलो, सडवा-रसायन २२ हजार ५०० लिटर, लोखंडी बॅरेल्स ५० नग, रसायनाने भरलेले ५० लिटर क्षमतेचे २५० ड्रम, जर्मन भांडी घमेली १५ नग, चाटू १५ नग, दांडीपिंप १५ नग, होसपाइप १० नग, हातभट्टी दारू ने भरलेले २० लिटर क्षमतेचे २५ कॅन्स, वजन काटा इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत पंजाब गजबे, लता कांबळे, पाखरा यादवकर व रंजना सुधाकर काळबांडे या चार आरोपींविरूद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक संजय आढाव व पोलिस उपनिरीक्षक साजिद अहमद, पटले, सावंत सहायक पोलिस निरीक्षक कोकर्डे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुभाष हनवते. दुय्यम निरीक्षक मुकुंद चीटमटवार, रवींद्र सोनोने, सागर धिडसे, राजेश मोहोड व स्टाफ सुधीर मानकर, रमेश कांबळे, शीतल सरोदे, समीर सईद, संजय राठोड, रवी इंगोले, देवेश कोटे, रवी निकाळजे, मिलिंद गायकवाड, महादेव कांगणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

फोटो - http://v.duta.us/o0HkngAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ZvSDswAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬