[nagpur] - आचारसंहितेनंतर कुदळ

  |   Nagpurnews

नगरसेवकांकडून घाई; कार्यादेश आधीच मंजूर झाल्याचा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली. नेमक्या याच काळात नगरसेवकांकडून कामांसाठी कुदळ मारण्यात आले. सर्वपक्षीय नगरसेवकांकडून ही घाई करण्यात आली असून, आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे. शनिवारी दुपारी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबरोबर आचारसंहिता लागू झाली. मात्र, अनेक नगरसेवकांनी काम होत असल्याचे दाखविण्यासाठी भूमिपूजन उरकून घेतल्याचे निदर्शनास आले. अशा नगरसेवकांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंदविण्याची गरज व्यक्त होत आहे.

शनिवारी सकाळी आचारसंहिता लागेल, याची कल्पना नव्हती. त्यामुळे नगरसेवक निश्चिंत होते. दुपारनंतर भूमिपूजन उरकून घेण्याचे अनेकांचे नियोजित कार्यक्रम होते. त्यासाठी प्रभागातील वस्त्यांमध्ये नागरिकांना गोळा करून त्यांच्यासमोर असे कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र, दुपारी १२ वाजता निवडणुकांच्या तारखांची घोषणा होत असल्याने तोवर भूमिपूजनाची तयारीच झालेली नव्हती. त्यामुळे धावाधाव करीत अनेकांनी कुठे स्वत: तर, कुठे संबंधित कामांच्या कंत्राटदाराच्या उपस्थितीत नागरिकांकडून कुदळ मारून घेतले. निवडणुका असल्याने गेल्या महिनाभरात शहरातील बहुतांश सर्वच प्रभागांत कोट्यवधीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारीच १५८ कोटींच्या कामांचे भूमिपूजन उरकले. तर, इतरांनी रविवारचा मुहूर्त साधला. परंतु, आचारसंहितेमुळे त्यांची अडचण झाली. अशावेळी कंत्राटदार वा वस्तीतील नागरिकांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन कार्यक्रम उरकण्यात आले. दक्षिण नागपुरातील प्रभाग क्र. ३३, प्रभाग क्र. ३५, उत्तर नागपुरातील प्रभाग क्र. ५ व इतरही भागात असे प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या कामांचे कार्यादेश आधीच झाल्याने हा आचारसंहितेचा भंग होत नाही, अशी पुस्तीही जोडण्यात आली. काही नगरसेवकांनी तर भूमिपूजन झाल्याचे जाहीर करीत कामे सुरू होत असल्याचे वस्त्यांमध्येच फिरून सांगितले. काहींनी मात्र कामांसाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगत नागरिकांना दिलासा दिला....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oLyYogAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬