[nagpur] - कापूस उत्पादकांना अमेरिकेला विकले!

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ

अमेरिकेतून कापसाची आयात करून राज्यातील ८६ कापूस उत्पादक तालुक्यातील शेतकऱ्यांना अमेरिकेला विकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अॅड. अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

राळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा झाला. यात बोलताना अॅड. आंबेडकर यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा समाचार घेतला. ते म्हणाले, अनेक मोठ्या शेतकऱ्यांकडे गेल्या वर्षीचा कापूस आहे. नवीन हंगामाचा कापूस अद्याप बाजारात आलेला नाही. त्यामुळे या काळात कापसाला आधारभूत किमतीपेक्षा ४००ते ५०० रुपये जास्त भाव मिळतो. गेल्या वर्षी कापसाचे आधारभूत मूल्य ५३०० रुपये प्रती क्विंटल होते. त्यात यावर्षी १०० रुपयांनी वाढ झाली. म्हणजे शेतकऱ्यांना आज खुल्या बाजारात ५७०० ते ५८०० भाव मिळायला हवा होता. आज शेतकऱ्यांना आधारभूत किंमत तर सोडा उलट ३५०० ते ४००० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. अमेरिकेतून चार हजार रुपये क्विंटलचा कापूस देशात येत असताना व्यापारी हा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांचा कापूस कसा विकत घेणार, असेही ते म्हणाले. कापसाला ३५०० हजार रुपये क्विंटलचा भाव हवा असल्यास जात पाहून मत द्या आणि आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव हवा असल्यास 'वंचित'चा पर्याय निवडा, असे आवाहनही त्यांनी केले.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/UjMatQAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬