[nagpur] - बुलडाण्यात खळबळ; एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह आढळले

  |   Nagpurnews

बुलडाणा: बुलढाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातील माळेगावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील ५ जणींचे मृतदेह माळेगावातील एका विहिरीत आढळून आले आहेत. मृतांमध्ये आईसह ४ मुलींचा समावेश आहे. आई उज्वला ढोके (३५), मुलगी वैष्णवी ढोके (९), दुर्गा ढोके (७), आरुषी ढोके (४) आणि पल्लवी ढोके या १ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. एकाच घरातील चौघींचा मृतदेह विहिरीत सापडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचेही वातावरण पसरले आहे.

गावातील विहिरीत ५ मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. आता हे पाचही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत....

फोटो - http://v.duta.us/Zj8NHQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/wpp-0QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬