[nagpur] - व्यायाम, आहारात आरोग्याची गुरुकिल्ली

  |   Nagpurnews

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

'नियमित व्यायाम, लैंगिक जीवनात सौख्य आणि सकस-संतुलित आहार ठेवला, तर मधुमेहीदेखील शंभर वर्षांपर्यंत जगू शकतात,' असा आशावादी सूर 'शंभर वर्षे कसे जगावे,' या विषयावरील परिसंवादामध्ये उमटला.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे महाएएमएसकॉन व निमॅकॉनचे आयोजन उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात करण्यात आले होते. या समारोपात रविवारी 'शंभर वर्ष कसे जगावे,' या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. व्यासपीठावर डॉ. संजय देशपांडे, डॉ. सुनील गुप्ता, डॉ. वर्षा झुनझुनवाला, डॉ. कविता गुप्ता, डॉ. दिवाकर भोयर उपस्थित होते.

डॉ. देशपांडे म्हणाले, हल्ली लैंगिक संबंधांकडे दुर्लक्ष होत आहे. आपण लैंगिकतेला महत्त्व देत नाही. निसर्गाची साखळी लैंगिकतेशी निगडीत आहे. चांगले जीवन मिळविण्यासाठी लैंगिक संबंध महत्त्वाचे ठरतात. हस्तमैथुनाबाबत अनेक गैरसमज आहेत. वास्तविक संपूर्णपणे सुरक्षित असून वीर्यनाशामुळे शक्ती कमी होईल, हेदेखील चुकीचे आहे....

फोटो - http://v.duta.us/nZk-ngAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/PhIf8QAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬