[nashik] - अर्जासाठी गर्दीचे चारच दिवस

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधानसभेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे १२ दिवस उमेदवारांच्या हातात असणार आहेत. २७ सप्टेंबरपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरुवात होणार असून, ४ ऑक्टोबर ही अखेरची मुदत आहे. त्यामुळे अवघे आठ दिवस उमेदवारांना मिळणार आहेत. त्यात पितृपक्षामुळे २९ सप्टेंबरपर्यंत निवडक अर्ज येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या आठ दिवसांत तीन दिवस सुटी असल्यामुळे उमेदवारांची दमछाक होणार आहे.

२७ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असली तरी त्या दिवशी आमावस्या सुरू होणार आहे. २८ रोजी महिन्याचा चौथा शनिवार व सर्वपित्री अमावस्या आहे. त्यानंतर रविवार आहे. सोमवार ३० सप्टेंबर अर्ज भरण्यासाठी गर्दीचा दिवस राहू शकतो. त्यानंतर १ ते ४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी संधी आहे. पण, २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुटी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ८ दिवस असले तरी ३ दिवस सुटीत गेल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत २७, ३० सप्टेंबर व १, ३, ४ ऑक्टोबर हे दिवस मिळणार आहेत. पण, यातील २७ सप्टेंबरला अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे फारसे अर्ज येणार नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबर व १, ३, ४ ऑक्टोबर या दिवसांतच गर्दी होणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/CpFVXAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬