[nashik] - इगतपुरीची जागा भाजपला सोडावी

  |   Nashiknews

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भाजप-सेना युतीबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. परंतु विधानसभेची इगतपुरी-त्र्यंबक ही जागा भाजपला सोडावी, असा आग्रह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. मतदारसंघात भाजपची पाळेमुळे विस्तारण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत भाजपमधून व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात सहकार आणि काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्यांचा भाजप प्रवेश झाला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती न झाल्याने वेळेवर उमेदवाराचा शोध घेऊन तेव्हा सनदी अधिकारी असलेल्या चंद्रकांत खाडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजप आणि संघ परिवाराचे अनेक वर्षांपासून हरसूल भागात काम सुरू आहे. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली व तेव्हापासून इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा नाशिक लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला आहे. तत्पूर्वी इगतपुरी विधानसभा डहाणू लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता. डहाणू लोकसभेसाठी अनेक वर्षे दिवगंत खासदार अॅड. चिंतामण वनगा हे भाजपकडून निवडणूक लढवत होते. ११व्या व १३ व्या लोकसभेसाठी ते निवडणूक जिंकले होते. त्यावेळी युती असताना लोकसभेसाठी भाजप आणि विधानसभेसाठी शिवसेना अशा दोन्ही राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांना निवडणूक चिन्ह पोहचविण्याची संधी मिळत होती. निवडणुकांच्या निमित्ताने पक्ष बांधणीसाठीही उत्तम वातावरण निर्माण झाले होते. तथापि, गत दोन निवडणुकांपासून लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही वेळेस भाजपने मित्रपक्ष शिवसेनेचा प्रचार करायचा हे भाजपच्या पक्षबांधणीला अडचणीचे ठरते आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांमध्ये त्र्यंबक तालुक्यात २० वर्षांपासून अद्याप एकही जागा भाजपला मिळवता आलेली नाही. तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष अद्याप बाळसे धरायला तयार नाही. त्र्यंबक शहरात एकहाती सत्ता असताना ग्रामीण भागात संधी मिळणार नाही म्हणून पूर्वी कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यास अडचणी येत होत्या. आता देशात आणि राज्यात भाजपची लाट असताना संधी गमावून चालणार नाही, यावर पक्षात एकमत होत आहे. लोकसभेच्या वेळी मित्रपक्षाला मदत आणि विधानसभेला स्वबळ हेदेखील पक्षातील निष्ठावंतांना गैरसोयीचे वाटत आहे. युती झाली तर भाजप इगतपुरीची जागा लढविणार आणि नाही झाली तर स्वबळावर लढवणारच असल्याच्या मुद्द्यावर आता ठाम मत झाले आहे. इगतपुरीची जागा शिवसेनेकडे असते, या भरवशावर माजी आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपचे अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करीत असलेल्या त्र्यंबक आणि इगतपुरी या दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी आता आम्ही गावितांचा प्रचार करायचा का, असा प्रश्न खासगी बैठकांमधून उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QJd9vwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬