[nashik] - कांदा, बाजरीही लष्कारीच्या कचाट्यात

  |   Nashiknews

अमेरिकने अळीच्या हल्ला, खरिपाचा हंगाम संकटात

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या बागलाण तालुक्यात यंदा शेवटी का असेना पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला. शिवार कसेबसे फुललेले दिसत असतानाच लष्करी अळीने मका पाठोपाठ आता बाजरी, कांद्यावरही हल्लाबोल केला आहे. सणासुदीचे दिवस तोंडावर आलेले, शिवारात पिक फुललेले असताना या संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

बागलाण तालुक्यात यंदाच्या मोसमात पावसाने उशिरा हजेरी लावली. अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. काही भागात तर 'नको नको रे पावसा' असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पावसाने आता विश्रांती घ्यावी, अशी विनंती शेतकरी करीत आहेत....

फोटो - http://v.duta.us/1rbCJAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/CleHZAAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬